महिला आरक्षण तत्काळ लागू करा, मात्र ‘मतदार संघ पुनर्रचना’ या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे! उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackrey-interview

नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना अशा दोन महत्त्वाच्या विधेयकांसाठी केंद्र सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. तीन दिवसीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून यामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयेकाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ज्यावर लोकसभेत सविस्तर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकाबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे.

या निवेदनातून ‘शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे’ असे म्हणत २०२३ साली महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले आहेच, त्यानुसार ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा! अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र त्याचवेळी मतदार संघ पुनर्रचना म्हणजे delimition या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे! अशी भूमिका घेतली आहे. त्याविषयी अधिक सविस्तर मत मांडताना हा एक व्यापक व राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, आमच्यासाठी हा एकाद्या पक्षाच्या राजकीय भविष्याचा विषय नसून देशाच्या भविष्याचा विषय आहे. म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणे आवश्यक आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.