
घरोघरी पूजा तसेच ओवाळणीसाठी चांदीची भांडी, पेला, वाटी तसेच ताम्हण वापरले जाते. काही दिवसांच्या वापरानंतर ही भांडी काळी पडू लागतात.
चांदीची भांडी चकचकीत करण्यासाठी एका वाटीत 2 चमचे तांदळाच्या पिठात थोडी टुथपेस्ट आणि डिशवॉश लिक्विड मिसळून घ्या. हे मिश्रण थोडा वेळ चांदीच्या भांडय़ांना लावून ठेवा. नंतर भांडी ओल्या कपडय़ाने पुसून घ्या.
पांढऱ्या रांगोळीमध्येही टुथपेस्ट मिसळून, या मिश्रणाने चांदीची भांडी स्वच्छ होतात. याशिवाय मीठ, लिंबू आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण उपयुक्त ठरते.



























































