
बाल्कनी, गच्ची किंवा घराच्या भिंतीवर उगवलेले वड, पिंपळाच्या रोपांमुळे घराच्या भिंतीमध्ये भेगा पडणे, सिमेंट सैल होणे अशा अडचणी निर्माण करतात.
एका बाटलीत कोमट पाणी घेऊन त्यात भरपूर मीठ मिसळा.
हे पाणी झाडाच्या मुळांवर आणि फटीत सावकाश ओता.
सलग काही दिवस हा उपाय केल्यास झाड कोमेजून लागते.
झाड काढल्यानंतर ती जागा मोकळी ठेवू नका.
त्या फटीत सिमेंट किंवा पाण्याला अडथळा करणारा लेप भरा.
त्यामुळे पुन्हा रोप उगवण्याची शक्यता कमी होते.

























































