भाजपच्या महिला नेत्याचा स्वतःच्या पिस्तूलमधून गोळी लागून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये भाजपच्या महिला नेत्याचा स्वतःच्याच पिस्तुलातून सुटलेली गोळी लागल्याने मृत्यू झाला. संगीता रजक असे त्यांचे नाव आहे. घराबाहेर सुरू असलेला गोंधळ आणि वादविवाद ऐकून संगीता रजक पिस्तूल घेऊन बाहेर आल्या. त्यांच्या स्वतःच्याच पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना गंभीर अवस्थेत ओमेगा रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.