
अमेरिका-इराण युद्ध, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव यामुळे जागतिक तेल बाजारात तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. जगातील अनेक देशांवर त्याचा परिणाम झाला आहे. आगामी दशकभरात जागतिक तेल समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. रशियन तेल कंपनी रोसनेफ्टचे सीईओ इगोर सेचिन यांनी भाकीत केले आहे की, येत्या दशकात जागतिक तेलाच्या मागणीत हिंदुस्थानचा वाटा सर्वाधिक असेल. हिंदुस्थानची मागणी जवळपास 50 टक्के असेल.
रोसनेफ्टचे सीईओ इगोर सेचिन यांच्या अंदाजानुसार 2035 पर्यंत जागतिक तेलाच्या मागणीतील वाढीमध्ये एकट्या हिंदुस्थानचा वाटा 50 टक्के असेल. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अंदाजांचा हवाला देत ते म्हणाले की, 2035 पर्यंत हिंदुस्थानचा तेल वापर दररोज जवळपास आठ दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचेल, जी 44 टक्के वाढ आहे, तर जागतिक मागणीत एकूण सुमारे पाच टक्के वाढ होईल.






























































