
शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली ठगाने वृद्ध महिलेची सवा दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक आहेत. मार्च महिन्यात त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती दिली जात होती. ग्रुपच्या अॅडमिनने त्यांना फोन करून गुंतवणुकीचा सल्ला दिला. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा दिला जाईल असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने सुरुवातीला काही रक्कम गुंतवणूक केली. त्या रकमेवर तिला चांगला फायदा झाला. नफ्याची रक्कम बँकेत जमा झाल्याने तिला विश्वास बसला. त्यामुळे तिने सवा दोन कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीवर 21 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे दिसून आले. त्यातील अकरा कोटी तिच्या आणि उर्वरित दहा कोटी तिच्या मुलाच्या खात्यात जमा झाल्याचे दिसून आले.




























































