अमेरिकन कंपनीने 250 हिंदुस्थानींना कामावरून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची रिअल इस्टेट टेक्नोलॉजी कंपनी ओपन डोरने हिंदुस्थानातील 250 कर्मचाऱयांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. कंपनी आता एआय आधारित टीमद्वारे आपल्या ऑपरेशन्सवर फोकस करणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच ओपन डोरने हिंदुस्थानात आपले ऑपरेशन सुरू केले होते. त्या वेळी 250 कर्मचाऱ्यांना नोकरी दिली होती, परंतु कंपनीने आपल्या कार्यशैलीत बदल केले आहेत. कंपनी आता हिंदुस्थानऐवजी अमेरिकेत कार्यालय सुरू करणार आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ काज नेजाटियन यांनी दिली. हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेबद्दल काही अडचण नाही. त्यांचे काम चांगले आहे. दुसऱ्या कंपन्यांमध्ये आम्ही शिफारस करू शकतो, परंतु आता सध्या कंपनी एआयवर फोकस करणार असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे काज नेजाटियन यांनी म्हटले आहे. आमचे सर्व ग्राहक हे अमेरिकेत आहेत. त्यामुळे आम्हाला हिंदुस्थानऐवजी अमेरिकेत राहून काम करणे जास्त चांगले राहील, असे म्हटले.