
अधिक मासानिमित्त काटेपूर्णा नदीपात्रात आंघोळ व पूजेसाठी गेलेल्या तीन महिला आणि एक मुलगा बुडाल्याची धक्कादायक घटना मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर गावाजवळ गुरुवारी घडली. वृषाली हरिदास खोत (35), त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत (10), माधुरी उमेश खोत व मीरा श्यासुंदर चौधरी हे चार जण अचानक नदीपात्रात बुडाले. या घटनेत वृषाली खोत व स्वराज खोत या माय-लेकाचा करुण अंत झाला, तर इतर दोन महिला बचावल्या.



























































