नाव वगळण्याआधी सात दिवसांची नोटीस द्या! काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळण्याआधी किमान सात दिवसांची लेखी नोटीस देऊन त्याला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली. विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम (एसआयआर) निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असावी असाही आग्रह व्यक्त करण्यात आला.

मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. या निवेदनात फॉर्म 7 चा दुरुपयोग थांबवून प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करावे, आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपूरला पायी चालत जातात, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींना सहभागी करून पारदर्शकता सुनिश्चित करावी, निष्कासित इमारती, चाळी आणि झोपडपट्टय़ांमधून स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे मतदानाचे अधिकार अबाधित राहण्यासाठी विशेष व्यवस्था करावी, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोगस नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.