गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

डॉ. श्रीकांत बनसोड यांची सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून गडचिरोली जिल्हा हे त्यांचे कार्यक्षेत्र असेल. पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून गेडाम यांचे कार्यक्षेत्र गडचिरोली व आरमोरी विधानसभा तर सुरपाम यांचे कार्यक्षेत्र अहेरी विधानसभा असेल. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुखपदी सुरेश कदम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दक्षिण रत्नागिरी (विधानसभा – रत्नागिरी, राजापूर, चिपळूण) करिता जिल्हा संपर्कप्रमुखपदी सुरेश आत्माराम कदम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.