
दिल्लीतील तुघलकाबादमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत व बचावकार्य सुरू केले. अग्नीशमन दलाने पाच जणांना सुखरूप बाहेर काढले असून, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे आगीची घटना घडली. पहाटे गाढ झोपेत असल्याने नागरिकांना स्वतःचा बचाव करता आला नाही. आग वेगाने पसरली आणि संपूर्ण इमारतील लोट पसरले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि तपास करण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.



























































