ट्रेंड – मेट्रोमध्ये मित्राला वाढदिवसाचे सरप्राईज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर  दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये  एका मित्राने मेट्रोमध्ये त्याच्या  मित्राचा वाढदिवस साजरा केला आहे. नेहमीप्रमाणे मेट्रोत प्रवाशांची गर्दी असते. त्या गर्दीत जागेवरून उठून तो ‘माझ्या मित्राचा वाढदिवस आहे’ असे सगळ्या प्रवाशांना सांगताना दिसतो आणि खाली बसतो. त्यानंतर सगळे प्रवाशी मिळून जोरात टाळ्या वाजवत ‘हॅप्पी बर्थडे’ गाणं म्हणायला सुरुवात करतात. इथपर्यंत वाढदिवस थांबत नाही तर मित्र लाडक्या मित्रासाठी मेलोडी
चॉकलेटचे पाकीट घेऊन येतो आणि दोन्ही मित्र मिळून प्रवाशांना चॉकलेट वाटताना दिसतात आणि इतर प्रवासीसुद्धा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल   व्हिडीओ @hr_hemant_15 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला.