
रोपाच्या कुंडीत मुंग्या झाल्या की, मातीला छिद्रे पडतात. तसेच रोप खराब होऊ लागते. मुंग्यांना रोपातून पळवून लावण्यासाठी सगळ्यात आधी कुंडी व्यवस्थित हलवून घ्या. यामुळे मातीत लपलेल्या मुंग्या बाहेर निघतील.
तुम्ही कुंड्यांच्या बाहेरच्या बाजूला मार्केटमध्ये मिळणाऱ्या खडूने लक्ष्मणरेषा काढा. तुम्ही कुंडीत दालचिनी पावडरही घालू शकता. कडुलिंबाच्या तेलाचा वा कॉफीच्या पावडरचाही वापर करू शकता. मुंग्या कमी होतात.


























































