असं झालं तर… आरटीआयचा अर्ज करूनही माहिती मिळत नसेल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहिती अधिकारात (आरटीआय) अर्ज केल्यानंतर अनेकै दिवस उलटूनही माहिती न मिळाल्यास किंवा नकार मिळाल्यास तुम्हाला प्रथम अपील करण्याचा अधिकार आहे.

मूळ अर्जाचे 30 दिवस संपल्यानंतर किंवा उत्तर मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत प्रथम अपील करता येते. प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करता येते.

सर्वसाधारणपणे पहिल्या अपिलासाठी फी नसते. अपिलीय अधिकाऱ्याला अर्ज मिळाल्यापासून 30 ते 45 दिवसांत सुनावणी घेऊन निकाल देणे बंधनकारक असते.

प्रथम अपिलीय अधिकाऱ्याच्या निर्णयाने समाधान झाले नाही किंवा तिथेही माहिती मिळाली नाही, तर तुम्ही माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करू शकता.

महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या किंवा केंद्र सरकारच्या विभागांसाठी RTI Online Portal चा वापर करता येईल.