गंगा आणि कावेरी नद्या जोडल्यास देशाची प्रगती होईल; चंद्राबाबू नायडू यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गंगा आणि कावेरी नद्या एकमेकींशी जोडल्यास देशाची प्रगती होईल, असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी कर्नाटकातील होस्पेट येथे व्यक्त केले. तुंगभद्रा प्रकल्पासाठी ३३ नवीन ‘क्रेस्ट गेट्स’च्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना नायडू यांनी हे मत व्यक्त केले.

गंगा आणि कावेरी नद्या जोडल्या गेल्या, तर देशाची प्रगती होईल. तसेच, गोदावरी आणि कावेरी नद्या जोडल्यास कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होतील, असेही ते म्हणाले. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे तुंगभद्रा आणि अलमट्टी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा येत नसल्याचे सांगत, त्यांनी या वर्षी पाण्याचा वापर काटकसरीने करण्यावर भर दिला आणि नद्या जोडण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. सर्वप्रथम राज्यांतर्गत नद्या जोडल्या जाव्यात आणि त्यानंतर इतर राज्यांमधील नद्या जोडल्या जाव्यात, असेही ते म्हणाले.