सामना अग्रलेख – भाजपचे महमूद गजनवी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्रज मोगल आक्रमकांपेक्षा देशातील मंदिरांची जास्त लूट भाजप काळात झाली आहे. मंदिरे भाजपचेच लोक लुटत आहेत, पण लवकरच बातमी येईल की, अयोध्या उज्जैनच्या लुटीमागे पाकिस्तानचा कट आहे. हिंदूंना, मंदिरांना बदनाम करण्याचा कटपाकिस्तानात शिजला आहे. राममंदिराचे ट्रस्टीचंपतराय हे रोज दुधाने आंघोळ करतात, पण पाकड्यांनी त्यांच्या दुधात भेसळ करून चंपतमियांना अपवित्र केले आहे. भाजपमधील महमूद गजनवी मंदिरे लुटत आहेत, हिंदुत्वाचे वाभाडे काढत आहेत. श्रीरामा, तूच बघ रे हे सर्व!

भाजप काळात देशातील प्रमुख मंदिरांची लूट सुरू आहे. त्यात अयोध्येतील राममंदिर व उज्जैनच्या महाकाल मंदिराचा समावेश आहे. शिवाय जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिरातला 550 कोटींचा चांदी घोटाळा, सबरीमाला मंदिरातला सोने चोरीचा घोटाळा, तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरातील 250 कोटींचा लाडू घोटाळा अशा प्रकरणांनी भाजपच्या हिंदुत्वाचा मुखवटा गळून पडला आहे. इतिहास काळात मोगलांनी मंदिरे लुटली. त्याचे खापर आजच्या मुसलमानांवर फोडले जाते, पण मोगलांनीही अचंबित व्हावे किंवा मोगल ‘संत’ वाटावेत अशा पद्धतीने श्रीराममंदिरापासून ते उज्जैनच्या महाकाल मंदिरापर्यंतची प्रकरणे समोर आली. उज्जैन हे हिंदूंचे एक श्रद्धास्थान आहे व लाखो हिंदू तेथे पूजा, नवस-सायास वगैरेंसाठी जात असतात. प्राचीन उज्जैन नगरीला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी मध्य प्रदेश भाजप सरकारने विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला. त्यात असे समोर आले की, विकास झाल्यावर आजच्या कवडीमोल किमतीच्या जमिनींना सोन्याचा भाव येईल. या हेतूने मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कुटुंबीयांनी या ‘मास्टर प्लॅन’ परिसरात 168 एकर भूखंड कोटय़वधींना खरेदी केले. मुख्यमंत्र्यांची पत्नी, सून, भाऊ, बहिणी, पुतण्या अशा संपूर्ण कुटुंबाने उज्जैन नगरीची लूट केली. जणू काही या कुटुंबाचा आर्थिक लाभ व्हावा यासाठी मंदिर विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. हिंदुत्वाच्या नावाने सुरू असलेली ही लूट गझनीच्या महमुदापेक्षा भयंकर आहे. मोगलांनी हिंदूंची मंदिरे लुटली. या पापाचा डाग भाजपच्या भ्रष्ट हिंदुत्ववाद्यांनी धुऊन काढला आहे. राममंदिरातील

देणग्या दानपात्रांच्या चोरीचे प्रकरण

र धक्कादायक असेच आहे. काही दशकांपूर्वी भाजपने ‘गंगाजल’ बाटल्या विकून कोटय़वधी रुपये जमा केले होते. त्याचा हिशेब कधीच दिला नाही. त्यानंतर राममंदिर देणग्यांची चोरी ‘कारसेवा’ काळापासून सुरू झाली. अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू होण्याआधी जमीन संपादन करण्यात आली. या वेळी भाजपसंबंधित मंडळींनी भराभर स्वस्तात जमिनी खरेदी केल्या व त्याच जमिनी चढय़ा भावाने राममंदिर ट्रस्टला विकल्या. त्यातून कोटय़वधींची उलाढाल केली. ज्या रामजन्मभूमीसाठी शेकडो लोकांनी रक्त सांडले, प्राणत्याग केला, त्याच जमिनीचा धंदा भाजपच्या लोकांनी उघडपणे केला. आता मंदिराचे निर्माण झाल्यावर हा संपूर्ण प्रकल्पच चोर-दरोडेखोरांचा अड्डा बनला आहे. राममंदिरातील देणग्या भाजपच्या एका गटाच्या कमाईचे साधन बनले आहे. हे चोर दुसरे तिसरे कोणी नाहीत, तर हिंदुत्ववादाचा व्यापार करणारे भाजपाई आहेत. राममंदिरात आतापर्यंत 1400 कोटींचा घोटाळा समोर आला. मोदींच्या काळात राममंदिराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर चोरीचे, कमिशनबाजीचे आरोप सुरूच आहेत. प्रकल्पाच्या सूत्रधारांनी प्रत्येक ठिकाणी 25 टक्के कमिशन घेतल्याचे पुरावे समोर आले. राममंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नित्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयनदास म्हणतात, ‘‘राममंदिरातील चोरी प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, पण चौकशी करायची कोणी? एकजात सगळे बेइमान आहेत. अयोध्येत आता कोणीच धुतल्या तांदळासारखे नाहीत.’’ हे एका संताचे उद्गार आहेत. हा साधा मामला नाही. शेकडो लोकांनी या

रामजन्मभूमीसाठी हौतात्म्य

त्करले. कल्याण सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांचे सरकारच बरखास्त झाले होते. रामजन्मभूमी आंदोलनात अनेकांनी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, परंतु या सर्व त्याग-बलिदानाच्या बळावर निर्माण झालेले राममंदिर चोरांच्या हाती गेले आहे. आता इथे तर कोणी महमूद गजनवी नाही. मग हिंदूंची मंदिरे कोण लुटत आहे आणि भाजप त्यावर तोंड बंद करून का बसला आहे? मंदिरातील सर्व कर्मचारी हे भाजपचेच कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. मंदिर निर्माणाच्या दरम्यान 1250 ‘रामशिला’ चोरीस गेल्या. या महागडय़ा शिळा मॉरिशस येथून आणल्या होत्या व त्यास सोन्याचा मुलामा होता. हजारावर सुवर्णशिला गायब झाल्या. जेथे जेथे हिंदुत्वाचा विषय आला तेथे चोऱ्या झाल्या. गंगेच्या शुद्धीकरण प्रकल्पात हजारो कोटी ठेकेदारांनी खाल्ले. प्रयागराजच्या कुंभमेळय़ात गुजरातच्या ठेकेदारांनी लूट केली. आता नाशिकच्या कुंभमेळय़ाच्या लुटीसाठी गुजरातचेच ठेकेदार एकत्र आले आहेत. इंग्रज व मोगल आक्रमकांपेक्षा देशातील मंदिरांची जास्त लूट भाजप काळात झाली आहे. मंदिरे भाजपचेच लोक लुटत आहेत, पण लवकरच बातमी येईल की, अयोध्या व उज्जैनच्या लुटीमागे पाकिस्तानचा कट आहे. हिंदूंना, मंदिरांना बदनाम करण्याचा ‘कट’ पाकिस्तानात शिजला आहे. राममंदिराचे ‘ट्रस्टी’ चंपतराय हे रोज दुधाने आंघोळ करतात, पण पाकड्यांनी त्यांच्या दुधात भेसळ करून चंपतमियांना अपवित्र केले आहे. भाजपमधील महमूद गजनवी मंदिरे लुटत आहेत, हिंदुत्वाचे वाभाडे काढत आहेत. श्रीरामा, तूच बघ रे हे सर्व!