
सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडीजवळ एक लहान मुलगी उभी आहे. ती मुलगी गाडीला हळुवारपणे स्पर्श करते. त्यानंतर गाडीचा बीप वाजतो. विशेष म्हणजे ती चिमुकली तो आवाज केवळ ऐकत नाही, तर त्या बीपच्या आवाजालाच जणू म्युझिक समजून नाचू लागते. गाडीचा हॉर्न वाजताच चिमुकली तालावर डोलू लागते. अगदी लयीत कधी पंबर, तर कधी हात-पाय हलवते. इतकेच नाही, तर नाचता नाचता ती गोंडस हावभावही करते. तिची प्रत्येक हालचाल इतकी निरागस आणि सहज असते की, कुणीही थक्क होईल. या व्हिडीयोला लाखो ह्यूज आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.





























































