ऋतुराज, पडिक्कल अपयशी; एकहाती खिंड लढवत श्रीलंका ‘अ’ विरुद्ध साई सुदर्शनचे झंझावाती शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाने तिरंगी मालेकिवर कब्जा केल्यानंतर आता हिंदुस्थान श्रीलंका दौऱ्यात श्रीलंकेला लोळवण्यासाठी सज्ज झाली आहे. आजपासून (25 जून 2026) हिंदुस्थान ‘अ’ संघाचा श्रीलंका दौरा सुरू झाला आहे. दौऱ्यातील पहिल्या अनौकपचारिक कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी साई सुदर्शनने आपली झलक दाखवून दिली आहे. अफगाणिस्तान कसोटीत शांत राहिलेली त्याची बॅट आज चांगलीच तळपली आणि त्याने हटके अंदाजाच आपलं शतक पूर्ण केलं. संघ अडचणीत असताना त्याने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संयमी खेळी केली.

या सामन्यात साई सुदर्शनने अवघ्या 130 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, ज्यामध्ये 14 चौकारांचा समावेश होता. एका बाजूने विकेट्स पडत असतानाही त्याने धीर न सोडता खेळपट्टीवर पाय रोवून धरले आणि आधी अर्धशतक व नंतर शतकी टप्पा पार केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण खेळीदरम्यान त्याने संयम राखत एकही षटकार मारला नाही आणि केवळ चौकारांच्या जोरावर धावांचा पाऊस पाडला. सुदर्शनच्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 200 धावांचा टप्पा ओलांडला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला इतर प्रमुख फलंदाजांची अपेक्षित साथ लाभली नाही. त्याचा सलामीचा जोडीदार आयुष पांडे अवघ्या 25 धावा करून बाद झाला.

FIFA World Cup 2026 – मेस्सी, रोनाल्डोची केली बरोबरी! मेक्सिकोच्या गोलकीपरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थान ‘अ’ संघातील इतर स्टार खेळाडू पहिल्या दिवशी पूर्णपणे अपयशी ठरले. फॉर्मात असलेला देवदत्त पडिक्कल 12 धावांची छोटी खेळी करून तंबूत परतला, तर अनुभवी ऋतुराज गायकवाडने काही वेळ खेळपट्टीवर काढला खरा, पण तोही 22 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. या संघात शेख रशीद, हर्ष दुबे, अंशुल कंबोज आणि ऑकिब नबी यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.