
पत्ता बदलण्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. पासपोर्टवरील पत्ता बदलायचा असेल तर पासपोर्ट सेवा पोर्टलवर पत्ता बदलण्यासाठी अर्ज करावा लागेल.
पासपोर्ट सेवा पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा किंवा आधीपासून खाते असल्यास लॉग इन करा. ‘Apply for Fresh Passport/Reissue of Passport’ या पर्यायावर क्लिक करा.
फॉर्ममध्ये ‘Change in Existing Personal Particulars’ निवडा आणि नवीन पत्ता टाका. फॉर्म भरून झाल्यावर तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राची तारीख आणि वेळ निवडा
ठरलेल्या दिवशी खालील कागदपत्रे घेऊन पासपोर्ट केंद्रावर जा. तुमचा जुना पासपोर्ट, नवीन पत्त्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड, लाईट बिल, गॅस बिल किंवा बँक पासबुक)
पासपोर्ट केंद्रामध्ये कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, तुमच्या नवीन पत्त्यावर पोलीस पडताळणी होईल. नवीन पत्त्याचा पासपोर्ट तुमच्या घरी पोस्टाने येईल.





























































