मला मॅटर्निटी लिव्ह घ्यावी लागेल! समंथा रुथ प्रभूने गरोदरपणाची केली अधिकृत घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने आपण गरोदर असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. समंथाचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘मा इंटि बंगारम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमात समंथाने आपल्या गरोदरपणाबाबत खुलासा केला. “माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे ‘मा इंटि बंगारम’नंतर मला काही काळासाठी ब्रेक घ्यावा लागेल. आता मला मॅटर्निटी लिव्ह घ्यावी लागेल. मात्र या काळानंतर मी पुन्हा नव्या चित्रपटासह चाहत्यांच्या भेटीला येईन,” असे ती म्हणाली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर समंथाच्या गरोदरपणाच्या चर्चा रंगल्या होत्या. चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांदरम्यान तिच्या ‘बेबी बंप’बाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर स्वतः समंथानेच या चर्चांवर शिक्कामोर्तब करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

समांथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता

समंथा आणि राज निदिमोरू यांनी डिसेंबर 2025 मध्ये कोयंबतूर येथील ईशा फाउंडेशनमध्ये झालेल्या खासगी समारंभात विवाह केला होता. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमात समंथाने नातेसंबंधांबाबतही आपले विचार मांडले. कोणतेही नाते यशस्वी होण्यासाठी दोन्ही व्यक्तींनी समान प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ती म्हणाली.

दरम्यान, ‘मा इंटि बंगारम’ या चित्रपटाद्वारे समंथा आणि दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांची भट्टी पुन्हा एकदा जमली आहे. या चित्रपटात गुलशन देवय्या, दिगंत मंचाले, गौतमी तडीमल्ला, श्रीमुखी आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.