तंजावरचे स्थलमहात्म्य – तंजावरची चित्रशैली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. समीर जाधव

[email protected]

तंजावरच्या इतिहासातील चित्रकलेला राजाश्रय देण्याची नायककालीन परंपरा कायम ठेवत मराठय़ांनी सोन्याच्या पातळ पत्र्यावर रत्ने जडून चित्रे सजवण्याची मुघल शैली आत्मसात केली. ही चित्रशैली आज तंजावरची ओळख बनली आहे.

भारतीय चित्रकलेच्या इतिहासात तंजावरचे स्थान विशेष आहे.  तंजावरमधील चित्रकलेचे ऐतिहासिक संदर्भ तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचे आहेत. ‘नेडुनालवाताई’, ‘अकनानुरु’ आणि ‘परिपाडल’ यांसारख्या प्राचीन तामीळ साहित्यकृतींमध्ये अशा भव्य वास्तू व राजवाडय़ांचा उल्लेख आजिथे पौराणिक किंवा शृंगारिक विषयांवर आधारित चित्रे काआहेत. बृहद्देश्वर मंदिरातील मुख्य गर्भगृहाच्या बाह्य भिंतीच्या आतील बाजूस, तसेच खालच्या प्रदक्षिणा मार्गातील आतील भिंतीवर, खांबांवर आणि छतावर चोलकालीन चित्रे पाहायला मिळतात.

नायक राजांच्या काळात चोलकालीन भित्तिचित्रांवर नवीन चित्रे कागेली होती. 1930 च्या दशकात नायककालीन चित्रांचे काही थर निखळून पडल्यामुळे त्याखालील चोलकालीन उत्कृष्ट कलाकृती पुन्हा उजेडात आल्या. ही चोल चित्रे बहुधा मंदिर उभारणीच्या काळातीलच असावीत. मराठय़ांनी चित्रकलेला राजाश्रय देण्याची नायककालीन परंपरा कायम ठेवली, परंतु त्यासोबतच सोन्याच्या पातळ पत्र्यावर रत्ने जडून चित्रे सजवण्याची मुघल शैलीही त्यांनी आत्मसात केली. आज ही चित्रकला तंजावरची ओळख बनली आहे. तंजावरच्या चित्रशैलीचे प्रामुख्याने  चार प्रकार आहेत – भिंत चित्रे, लाकडावरील चित्रे (सोनेरी नक्षीकामासह), काचेवरील चित्रे, लघुचित्रे.

असे असले तरी सोनेरी वर्ख असलेली लाकडावरील चित्रे हे तंजावरच्या चित्रशैलीचे प्राण आहे. तंजावर या चित्रशैलीचे वैशिष्टय़पूर्ण योगदान म्हणजे दागिने, वस्त्रs आणि वास्तुकलेची वैशिष्टय़े सुशोभित करण्यासाठी रत्नजडित सोन्याचा वर्ख वापरणे. मराठा शासकांच्या सुरुवातीच्या व्यक्तिचित्रांमध्ये ठोकून तयार केलेला सोन्याचा वर्ख वापरला जात असे, जो डिंकाने चिकटवून गुळगुळीत दगडाने घासला जात असे.ज्या पृष्ठभागावर चित्र कायचे होते, तो पृष्ठभाग डिंक, खडूची पूड, ‘गोपी’ (पिवळी पूड) यांचा लेप लावून तयार केला जात असे आणि नंतर पूर्णपणे गुळगुळीत पृष्ठभाग तयार करण्यासाठी तो गोल दगडाने किंवा काचेने घासून गुळगुळीत केला जात असे. चिंचेच्या झाडाच्या फांद्या तापवून आणि कोळसा करून तयार केलेल्या कोळशाने रेखाटन केले जात असे. पाने, फुले आणि खनिजे यांपासून रंग तयार केले जात असत. खनिजे खलबत्त्यात वाटून घेतली जात.पाण्यात भिजवून त्याची बारीक भुकटी करून प्राथमिक रंग तयार केले जात. आवश्यकतेनुसार, पायाभूत मिश्रणाने चित्राचा पृष्ठभाग उंचवला जात असे आणि त्यावर सोन्याचा वर्ख लावला जात असे.

सोन्याचा वर्ख म्हणजे खरे तर चांदीच्या वर्खाचा लेप दिलेला आणि केशर व इतर औषधी वनस्पतींच्या धुरात वाळवलेला हस्तनिर्मित सोनेरी कागद होता. हा सोनेरी कागद केवळ चित्रांवरच नव्हे, तर चित्रचौकटी, पूजेच्या वस्तू आणि मंदिरातील वाहनांवरही वापरला जात असे. चित्रातील आकृत्या ताठर आणि स्थिर आहेत. चित्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवणारी एक मुख्य आकृती त्यात आहे. इतर आकृत्या सेवक किंवा भक्त – अतिशय लहान आकाराच्या आहेत. आकृत्या गुबगुबीत आणि धष्टपुष्ट आहेत. या आकृत्या द्विमितीय स्वरूपाच्या असून त्यांमध्ये खोली किंवा आकारमान दर्शवणारी कोणतीही वैशिष्टय़े नाहीत. रेखांकन सशक्त आणि प्रभावी आहे, बाह्यरेषा गडद आहेत. मात्र आकृतीचा गोलसरपणा अधिक ठळक करण्यासाठी त्वचेच्या रंगांना छटा दिलेल्या आहेत. एखाद्या धार्मिक आकृतीला सोन्याचे संपूर्ण कवच आणि सोन्याचा मंडप असू शकतो, तर राजांच्या किंवा चवरी वाहणाऱयांच्या मानवी आकृत्यांवर विस्तृत सोन्याचे अलंकरण केलेले असते. सुरुवातीच्या काळात सोन्याचा वापर मर्यादित होता. नंतरच्या काळात रत्नजडित चित्रांच्या लोकप्रियतेमुळे सोन्याचा वापर वातंजावरमधील बहुतेक चित्रकला ही राजदरबारी चित्रकला होती आणि त्यामुळे व्यक्तिचित्रणाची लोकप्रियता थेट देवांपर्यंतही पोहोचली. उदाहरणार्थ, प्रसिद्ध ‘रामपट्टाभिषेकम’ चित्रे ही स्थिर राजदरबारातील दृश्ये आहेत, ज्यात राम आणि सीता मराठा सिंहासनावर बसलेले आहेत. मराठाकाळातील चित्रशैलीत प्रामुख्याने भिंतींवर काचित्रेही आसरस्वती महाल ग्रंथालयाला भेट देणाऱयाचे लक्ष सर्वप्रथम प्रवेशद्वारावरील विशाल भित्तिचित्राने वेधले जाते. अशी भित्तिचित्रे अनेक इमारतींमध्ये आआजही तंजावरमध्ये चित्रशैलीची ही परंपरा सुरू आहे. या जुन्या शैलीतील कलाकार आता कमी उरले असले तरी अनेक नवीन लोकांनी ही कला आत्मसात केली आहे.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)