
पाणी टंचाईमुळे गॅलनमधून घरी पाणी नेणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना कारने उडवल्याची घटना आज रात्री उशिरा टिटवाळा पुर्वेतील इंदिरा नगर परिसरात घडली. या घटनेत ही तीनही मुले गंभीर जखमी झाले आहेत.
टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरात किशन आनंद (12), अनिकेत कुमार (13) आणि रिषभ शर्मा (13) ही तीन मुले पाणी टंचाईमुळे रस्त्यावरील नळातून पाणी भरून घरी चालली होती. इतक्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात ही तीनही मुले जखमी झाली, त्यांना तातडीने जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे. या अपघातानंतर ही भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गाळ्यात शिरली.




























































