पनवेलमध्ये ’जीबीएस’चे दोन रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिलेन-बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे दोन रुग्ण पनवेलमध्ये आढळले आहेत. यातील एक तरुण उपचारानंतर घरी परतला असून 71 वर्षीय महिलेवर नवीन पनवेलमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन पनवेल महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

पहिला तरुण रुग्ण हा चौक येथील रहिवासी असून तो एप्रिल महिन्यात जर्मनीहून सुट्टीसाठी किचुंबे येथे आला होता. त्यानंतर तो चौकजकळील काकंडळ गावात वास्तव्यास असताना त्याला अशक्तपणा जाणवू लागला. 6 जून रोजी त्याला नवीन पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर 15 जून रोजी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.

दुसरा रुग्ण 71 वर्षांचा असून त्या मूळच्या कोकणातील रहिवासी आहेत. 26 मे रोजी पनवेल येथील तक्का येथील त्यांच्या नातेकाईकांकडे आल्या. त्यानंतर त्या 31 मे रोजी चारधाम यात्रेला गेल्या. 12 जून रोजी परतल्यानंतर 14 जूनपासून त्यांना ताप व अशक्तपणा जाणवू लागला. त्यांच्याकर नवीन पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले.