
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी हिंदुस्थानचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माला मोठा धक्का बसला आहे. कारण अभिषेकला आयसीसीच्या टी-20 क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. अभिषेकला मागे टाकत आता ईशान किशन आता अव्वल स्थानाच्या सिंहासमावर आरूढ झाला आहे.
27 वर्षीय ईशानने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने या वर्षीच्या टी–20 विश्वचषकातही 317 धावा करत शानदार कामगिरी केली होती. कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीसाठी ईशानला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला होता. 2026 च्या टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकात तो संजू सॅमसननंतर स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
ईशान चौथा हिंदुस्थानी खेळाडू
आयसीसी टी–20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा ईशान हा चौथा हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनी अव्वल स्थान पटकावले होते.



























































