
दिग्गज खेळाडू सेट व्हायला वेळ घेतो, पण एकदा सेट झाल्यावर त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. हीच गोष्ट फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेबाबत या वर्ल्ड कपमध्ये घडली. फ्रान्सने बाद फेरीतील पहिल्या सामन्यात स्वीडनला 3-0 असे पराभूत केले, ज्यामध्ये दोन गोल एम्बाप्पेचे होते. या दोन गोलमुळे एम्बाप्पेने ब्राझीलच्या रोनाल्डोला मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.
रोनाल्डो, पेले यांनाही मागे टाकले
एम्बाप्पेने आता विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये आपल्या नावावर एकूण 10 गोल केले आहेत, ज्यामुळे त्याच्या नावावर एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. बाद फेरीच्या टप्प्यात 10 गोल करत एम्बाप्पेने ब्राझीलचे दिग्गज रोनाल्डो नाझारियो आणि लिओनिडास यांना मागे टाकले, ज्यांनी बाद फेरीत प्रत्येकी 8 गोल केले होते. त्यांच्यापाठोपाठ फ्रान्सच्या जस्टिन फॉन्टेन आणि ब्राझीलचे पेले आहेत, ज्यांनी बाद फेरीच्या सामन्यांमध्ये प्रत्येकी 7 गोल केले आहेत.
मिरोस्लाव क्लोझला टाकले मागे
एम्बाप्पेने स्पर्धेच्या इतिहासातील जर्मनीचा महान खेळाडू मिरोस्लाव क्लोझला मागे टाकले आहे. कारण आता वर्ल्ड कपमधील एम्बाप्पेच्या गोलांची संख्या 18 पर्यंत पोहोचली आहे.
गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सीची बरोबरी
स्वीडनविरुद्ध दोन गोल केल्यानंतर एमबाप्पे गोल्डन बूटच्या शर्यतीत संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचे आणि लिओनेल मेस्सीचे प्रत्येकी सहा गोल आहेत. नॉर्वेचा आर्ंलग होलांड पाच गोलांसह तिसऱ्या स्थानावर आहे,
आता मेस्सीच्या वर्ल्ड रेकॉर्डवर लक्ष
लिओनेल मेस्सी 19 गोलांसह फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये केवळ पाच गोल केले आहेत. एम्बाप्पेने बाद फेरीचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. पण एकूण वर्ल्ड कपच्या गोलमध्ये तो आता मेस्सीला मागे टाकू शकतो.



























































