हे करून पहा -पावसाळ्यातही मसाले राहतील चांगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 बदलत्या वातावरणामुळे अनेकदा किचनमधले मसाले लवकर खराब होतात. याचे मुख्य कारण म्हणजे हवेतील वाढलेली आर्द्रता. जास्त आर्द्रतेच्या संपका&त आल्याने मसाले ओलसर होतात आणि हळूहळू त्यांचा सुगंध व चव नाहीशी होते. तर काही मसाल्यांना बुरशी किंवा कीड लागण्याचा धोकाही वाढू शकतो.
 मसाले दमट होऊ नये म्हणून ते नेहमी हवाबंद डब्यांमध्ये ठेवा. मसाले काढताना नेहमी कोरडा व स्वच्छ चमचा वापरा. ते गॅस स्टोव्ह, सिंक किंवा वाफ व पाण्याच्या संपका&त येणार नाही याची काळजी घ्या. मसाल्यांमधील दमटपणा कमी करण्यासाठी त्यांना अधेमधे ऊन दाखवा.