
आजच्या काळात सर्वात जास्त नातं टिकवणं अवघड काम आहे. असं असलं तरी नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत. जर नातं टिकवायचं असेल तर त्यात जुळवून घ्यावं लागतं आणि तडजोड करावी लागते तरच नातं टिकून राहतं आणि प्रेम वाढत जातं, असा महत्त्वाचा सल्ला ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमान यांनी आजच्या तरुणाईला दिला आहे. झीनत यांनी आजच्या काळातील जोडप्यांना लग्नाच्या कायदेशीर नात्याबद्दल आणि त्यासोबत येणाऱया आयुष्यभराच्या कमिटमेंटबद्दल सल्ला दिला.
आजच्या काळात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. पूर्वीही अशीच परिस्थिती होती. आधीच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये जास्त फरक नव्हता. त्यामुळे लग्नाचं नातं आयुष्यभरासाठी स्वीकारण्यापूर्वी एकमेकांसह किती गोष्टी जुळतात हे तपासून पाहणं गरजेचं आहे, असं मला वाटतंय, असे झीनत या वेळी म्हणाल्या. लोकांना वाटतं की, रोमान्स हा कायम राहतो, पण तसं अजिबात नसतं. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. नात्यांवर नेहमी काम करावं लागतं आणि ते टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तरच ते नातं टिकते, असे त्या म्हणाल्या.
मी सोशल मीडियावर एक लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल पोस्ट टाकली होती. माझ्या मागच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्यापैकी एकानं मला रिलेशनशिप बद्दल सल्ला विचारला होता. हे माझं एक वैयक्तिक मत आहे जे मी यापूर्वी कधीही मांडलेलं नाही. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर लग्न करण्यापूर्वी एकत्र राहण्याचा सल्ला मी देईन. मी माझ्या मुलांनाही नेहमी हाच सल्ला दिला आहे. पंधरा वर्षांच्या दुःखी वैवाहिक जीवनापेक्षा पाच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं चांगलं, असं झीनत यांनी म्हटलं आहे.
जर नातं टिकवायचं असेल तर त्यात जुळवून घ्यावं लागतं आणि तडजोड करावी लागते तरच नातं टिकून राहतं आणि प्रेम वाढत जातं. नात्यांवर नेहमी काम करावं लागतं आणि ते टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तरच ते नातं टिकतं






























































