
फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एमबाप्पेच्या दोन धडाकेबाज गोलच्या जोरावर माजी विजेत्या फ्रान्सने स्वीडनचा 3-0 असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह फ्रान्सने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. या सामन्यात दोन गोल करत एमबाप्पेने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या विश्वचषकातील गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
मेटलाइफ स्टेडियमवर 80 हजारांहून अधिक क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात फ्रान्सने सुरुवातीपासूनच स्वीडनवर दबाव राखला. फर्स्ट हाफ संपायला आलेला असताना 45 व्या मिनिटाला एमबाप्पेने स्वीडनच्या बचावपटूंना चकवून पहिला गोल डागला आणि फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेकंड हाफमध्ये 53 व्या मिनिटाला ब्रॅडली बारकोला याने ओलिसेच्या पासवर दुसरा गोल करत फ्रान्सची आघाडी दुप्पट केली. सामन्याच्या 74 व्या मिनिटाला एमबाप्पेने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करत फ्रान्सचा विजय निश्चित केला.
🇫🇷 France have qualified for the Round of 16!#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 30, 2026
दरम्यान, या स्पर्धेत 6 गोलसह एमबाप्पे सध्या अव्वल स्थानावर असून त्याने लिओनेल मेस्सीच्या एकूण 18 विश्वचषक गोल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मेस्सीचा 19 गोल्सचा सर्वकालिक विक्रम मोडण्यापासून तो आता अवघा एक गोल दूर आहे. तसेच विश्वचषकाच्या बाद फेरीत एमबाप्पेच्या नावावर आता सर्वाधिक 10 गोल्सची नोंद झाली आहे. त्याने ब्राझीलचे महान खेळाडू रोनाल्डो आणि लिओनिडास (प्रत्येकी 8 गोल) यांचा विक्रम मागे टाकला.
Kylian Mbappé becomes the top European goalscorer in #FIFAWorldCup history 🌟 pic.twitter.com/96wJcfhip1
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 1, 2026
पुढील लढत पॅराग्वेशी
सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय बाळगून असलेल्या फ्रान्सचा पुढील सामना आता 4 जुलै रोजी फिलाडेल्फिया येथे पॅराग्वेविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्यपूर्व फेरीत कॅनडा किंवा मोरोक्कोविरुद्ध भिडणार आहे.






























































