
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळत असताना आता पुन्हा त्यात वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलबाबत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ट्रम्प यांनी अमेरिकेला इस्रायलमधील आपल्या मित्रपक्षांना तोंड बंद ठेवण्यास सांगावे. जर तसे झाले नाही, तर आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवू, असा इशारा इराणने दिला आहे. इराणी जनता आणि नेतृत्वाला कोणत्याही प्रकारची धमकी दिल्यास त्याला तात्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
सय्यद अब्बास अराघची म्हणाले, ट्रम्प यांनी इस्रायलमधील आपल्या पाळीव प्राण्यांचे तोंड बंद करायला सांगावे. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही, तर इराण त्यांना धडा शिकवेल. आमच्या लोकांविरुद्ध आणि नेतृत्वाविरुद्ध कोणत्याही धमकीला तात्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव स्वीकारणार नाही, असे अराघची यांनी स्पष्ट केले.
अराघची यांनी ट्रम्प यांना इस्रायलमधील आपल्या मित्रपक्षांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. ते अमेरिकेची आज्ञा मोडतील, तर इराण प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांचे हे वक्तव्य अमेरिका आणि इस्रायलला इराणकडून दिलेला एक कठोर इशारा आहे. त्यामुळे तणावात वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.





























































