
राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा मुद्दा देशासह जगभरात गाजत आहे. विरोधकांसह जनतेने हा मुद्दा लावून धरला आहे. आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रावणाने माता जानकीचे अपहरण केले, तेव्हा त्याचा संपूर्ण वंश नष्ट झाला. आज लाखो लोकांच्या श्रद्धेशी विश्वासघात झाला आहे. यातील आरोपींना देवाच्या दरबारात मोठी शिक्षा होणार, हे निश्चित आहे, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री राम जन्मभूमी मंदिरातील देणगी घोटाळ्याच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. राम मंदिरासाठीच्या देण्यात आलेल्या देणगीच्या अपहाराचे आरोप झाल्यापासून, विरोधक सातत्याने टीका करत आहेत. देणगीच्या घोटाळ्यामुळे सनातन धर्माचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी देणगी चोरीचे महापाप केले आहे, त्यांना देवाच्या दरबारात मोठी शिक्षा होणार, हे निश्चित आहे, असे ते म्हणाले.
रावणाने फक्त माता जानकीचे अपहरण केले होते, त्या पापामुळे त्याचे संपूर्ण घराणे नष्ट झाले. आज, लाखो लोकांच्या श्रद्धा आणि भावनेशी विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांनी पाप केले आहे त्यांना कठोर शिक्षा होईल. जो कोणी देवाच्या ठिकाणी राहूनही देवाला घाबरत नाही आणि तरीही असा गुन्हा करतो, त्याला निश्चितच कठोर शिक्षा होईल. राम देणगी घोटाळ्याच्या घटनेनंतर, केवळ सनातन वैष्णव परंपरेतील, संत परंपरेतील आणि जे पूर्णपणे देवाला समर्पित आहेत, अशाच व्यक्तींना प्रभूच्या मंदिराची सेवा करण्याची जबाबदारी देण्यात यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.






























































