
दापोली तालुक्यातील वेळवी येथील रहिवासी अंकुश रसाळ यांच्या घरी अजगर शिरला होता त्याची खबर लागतात वेळवी गावचे सरपंच रणजीत दळवी यांनी दापोली येथील सर्पमित्र ओम साळवी व सुरेश खानविलकर यांना फोनवरून कल्पना दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्पमित्र ओम साळवी व सुरेश खानविलकर हे वेळवीत दाखल झाले व अंकुश रसाळ यांच्या घरी शिरलेल्या अजगराची सुखरूप सुटका केली व त्यास दापोली वन विभागाच्या स्वाधीन केले. या कामी ग्रामपंचायत कर्मचारी शुभम गुरव यांनी देखील सहकार्य केले. अजगराची सुखरूप सुटका झाल्याने अंकुश रसाळ यांच्यासह परिवार व शेजाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला व सर्पमित्रांचे कौतुक देखील केले.































































