
हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासात आजचा महत्वाचा ठरला आहे. बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे. या डेब्यूसह वैभवने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा तब्बल ३६ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.
सर्वांत कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा हिंदुस्थानी
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. आज वैभवचे वय अवघे १५ वर्षे आणि ९९ दिवस इतके आहे.
यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हा त्याचे वय १६ वर्षे आणि २०५ दिवस होते. वैभवने आता सचिनचा हाच विक्रम मागे टाकत हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. तसेच महिला क्रिकेटमधील हिंदुस्थानची युवा खेळाडू शेफाली वर्मा हिचा विक्रमही त्याने मागे टाकला आहे.



























































