
प्रभू श्रीरामाच्या नावावर अमर्याद सत्ता भोगणाऱ्या भाजपच्या राजवटीतच अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा पडल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिवसेनेने ‘रामरक्षा’ आंदोलन पुकारले होते. मुंबईतील दादर कबुतरखान्याजवळील ऐतिहासिक मारुती मंदिरासमोर या आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. विशेष म्हणजे, मुसळधार पावसाची तमा न बाळगता या आंदोलनासाठी रामभक्त आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)


































































