मानखुर्दमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना; चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच दरम्यान, मानखुर्द परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. मानखुर्द येथील जनता नगर भागात रविवारी (5 जुलै 2026) रात्री साडेआठच्या सुमारास एका तळ अधिक तीन मजली चाळीचा काही भाग अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि बचाव पथकाने तातडीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. मात्र, मृत आणि जखमींची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या 48 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की, शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून झाडे पडण्याच्या आणि गाड्या वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याच संततधार पावसामुळे मानखुर्दच्या या इमारतीला धोका निर्माण झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.