
हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार मुसळधार पावसाचा, तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे.
कार्यालये सुरू राहणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली असली, तरी मुंबईतील सर्व शासकीय व खासगी कार्यालये मात्र नियमितपणे सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामानाचा अंदाज पाहता नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी आणि अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




























































