ऑस्ट्रेलियन रणरागिणींची ‘कांगारू’शाही! इंग्लंडला रडवलं अन् सातव्यांदा उंचावला टी-20 विश्वचषक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा अभूतपूर्व विश्वविक्रम रचला आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडने दिलेले 151 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने बेथ मुनीच्या 64 (49 बॉल) आणि फोबे लिचफिल्डच्या 48 (35 बॉल) धावांच्या जोरावर 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केले. यापूर्वी टॉस हरून पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 150 धावा केल्या होत्या, ज्यात कर्णधार नॅट स्कीवर ब्रंटने सर्वाधिक 58 धावा केल्या. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही संघाला 7 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. ऑस्ट्रेलियन महिलांनी 2010, 2012, 2014, 2018, 2020, 2023 आणि आता 2026 मध्ये ही ट्रॉफी उंचावून इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ग्रुप स्टेजच्या 5 सामन्यांसह सेमी फायनल आणि फायनल अशा सलग 8 मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया ‘अजिंक्य’ चॅम्पियन ठरली आहे.