चेहऱ्याची नैसर्गिक चमक जपण्यासाठी, हे करूण पाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात वाढलेल्या दमटपणामुळे त्वचा तेलकट होते, चेहऱ्याची नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी 2 चमचे मुलतानी मातीमध्ये 2 चमचे गुलाब पाणी आणि थोडे दूध मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

1 चमचा मध, 1 चमचा कोरफड जेल आणि चिमूटभर हळद एकत्र करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते. आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा बेसन, हळद आणि दह्याचा फेस पॅक लावा.