
अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील कचरा डोंगराचे भूसखलन झाले. महापालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला. यामध्ये काही कर्मचारी दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 16 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून, अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापनाचे जवान पोहोचले आहे. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखालून दोन जणांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही बचावकार्य सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला, काही कर्मचारी दगावल्याची शक्यता pic.twitter.com/ifR2ji846l
— Saamana Online (@SaamanaOnline) July 8, 2026



























































