
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला त्यावेळच्या प्रसंगात महाराजांचे रक्षण करणारे जीवाजी महाले यांचे स्मारक किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी उभारले जाणार आहे. त्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. या घोषणेमुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यटनमंत्री महाबळेश्वर दौऱयावर असताना शिवप्रेमी संघटना आणि इतिहास संशोधकांनी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती.



























































