Ratnagiri News – इथं महावितरण कधी पोहचणार, शिरगाव कृषी संशोधन केंद्रात वीजेचा खांब लोंबकळतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रातील शेतमळ्यात महावितरणचा वीजेचा खांब कोसळून लोंबकळत आहे.तीन दिवस होऊन गेले तरी दुरूस्ती करिता महावितरणला वेळ मिळालेला नाही. इथं महावितरण कधी पोहचणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कृषी संशोधन केंद्रात भात लावणी आणि काही मळ्यात नांगरणीची कामे सुरू आहेत. शेतमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध हा वीजेचा खांब लोंबकळत असल्याने धोकादायक बनला आहे.काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र हा लोंबकळणारा वीजेचा खांब कधीही जमीनदोस्त होणार याची वाट तर महावितरण पहात नाही आहे ना असा प्रश्न निर्माण होत आहे.