
मंडणगड तालुक्यातील विविध समस्यांबाबत मंडणगड तालुका संघर्ष समिती कमालीची आक्रमक झाली असून समितीच्या वतीने तहसिलदार श्री. अक्षय ढाकणे यांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार श्री ढाकणे यांना निवेदन देताना संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. अरविंद येलवे, उपाध्यक्ष श्री.सिकंदर बुरुड, सचिव श्री.भरत सरपरे , कोषाध्यक्ष श्री .संकेत तांबे, श्री.मयुरेश धोत्रे, श्री.अमोल माळी, श्री.राजेंद्र शिंदे , श्री .बशीर मसुरकर आदींसह संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मंडणगड तालुका संघर्ष समितीने तहसीलदार श्री. अक्षय ढाकणे यांना दिलेल्या निवेदनात मंडणगड तालुक्यात विदयुत महावितरण कंपनी कडून सक्तिने लावण्यात येणारे आणि लावलेले स्मार्ट मीटर त्वरित काढून टाकण्यात यावेत. स्मार्ट मीटर मुळे विदयुत बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे व स्मार्ट मिटर लावण्या करिता जुन्या विद्युत मिटरची बिले वाढीव येत आहेत. ग्राहकाला न विचारताच वा परवानगी न घेताच विदयुत मीटर लावण्यात येत आहेत हे त्वरित बंद करावेत. त्याचप्रमाणे लोणंद राजावाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ वर्ष उलटून गेली तरी महामार्गाचे काम अजूनही अपूर्णच आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मूळ गावी आंबडवे येथे जाणारा रस्ता खोदलेला आहे. मंडणगड शहर बाजारपेठेत चुकीचं काम करून रस्त्याची रुंदी कमी केली आहे.
पावसाच्या तोंडावरती एका बाजूने रस्ता चालू केल्याने वाहनांना व स्थानिक व्यावसायिकांना तसेच विद्यार्थ्यांना प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे . महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अक्षय कंट्रक्शनला धडा शिकवावा अशा मागण्या निवेदनाद्वारे तहसीलदार श्री.अक्षय ढाकणे यांच्यासमोर ठेवण्यात आलेल्या असून या रास्त मागण्यांची पूर्तता झाली नाही तर जनहीतासाठी म्हणून निवेदन दिल्याल्याच्या आजपासुन २० दिवसानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे आहे.आंदोलना दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची सारी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे देखील सांगण्यात आले आहे.
आंबेत पुल दुर्घटनेची चौकशी करुन वाळु ठेकेदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी त आंबेत पुलाला वाळुची बार्ज धडकून झालेल्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी निष्काळजीपणा दाखवणारे अधिकारी व ड्रेझरचे मालक यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष अरिवंद येलवे यांनी केली आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट लवकर पुर्ण करुन वाहतूक चालू करण्यात यावी घटनेससाठी कारणीभुत बार्जे मालक वाळु ठेकेदार यांचे विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.






























































