हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, 3.5 रिश्टर स्केलची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरू असताना शनिवारी सकाळी 11.26 मिनिटांनी भूगर्भातून आवाज व सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची भूकंप मापक केंद्रावर 3.5 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील वसई आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही; परंतु, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री भूंकपाचे लागोपाठ चार धक्क्यांचे हादरे बसले होते. दरम्यान, आज शनिवारी सकाळी 11.26 मिनिटांनी भूगर्भातून आवाज व सौम्य धक्का जाणवला आहे. सदर धक्क्याची भूकंप मापक केंद्रावर 3.5 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील वसई आहे. वसई गावासह हिंगणी, दुर्ग धामणी, येडूद, कंजारा, जामगव्हाण काकाडधाबा या गावांना भूकंपाचा धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही; परंतु, नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.