चेंबूर झाड दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरून संताप, महापौरांनी अहवाल फेटाळला; शिवसेनेची दोषींवर कठोर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून मुलाचा जीव गेल्याच्या दुर्घटनेच्या चौकशी अहवालात उद्यान आणि रस्ते विभागापासून सर्वांना क्लीन चिट दिली. यावरून आता सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. निष्पाप मुलाला हाच न्याय का? असा सवाल केला जात आहे. महापौर रितू तावडे आणि विरोधकांनी हा अहवाल अमान्य केला आहे. त्यांनी या समोर आलेले आहेत. दुर्घटनेतील जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, चेंबूर दुर्घटनेनंतर सत्ताधारी आणि प्रशासनातील मतभेद आधीच एसआयटीकडून मार्फत चौकशी करावी.

या घटनेची त्रयस्थ संस्था किंवा एसआयटीकडून चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेने केली. चौकशी समितीमध्ये उपायुक्त पुरुषोत्तम माळवदे आणि शशिकांत भुरे यांची सदस्य होते. मात्र भुरे गेली रवर्षे उपायुक्त (पायाभूत सुविधा) म्हणून काम करीत आहेत. ज्या विभाग अधिकाऱ्याशी चौकशी संबंधित आहे त्यालाच चौकशी समितीवर नियुक्ती करणे योग्य नाही, असे पत्र शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी आयुक्तांना दिले आहे.

 

सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही : किशोरी पेडणेकर

झाड पडून विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू हा पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणि विविध विभागांतील समन्वयाच्या अभावाचा परिणाम आहे. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने सादर केलेला अहवाल हा सत्य दडपण्याचा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

 

महापालिकेच्या विविध विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे मुंबईकरांना आपल्या जिवाची किंमत मोजावी लागत आहे. सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर कोणताही अंकुश उरलेला नसून, प्रशासकीय अधिकारीच सत्ताधाऱ्यांवर वरचढ ठरत आहेत. त्यामुळे जबाबदारी निश्चित करण्याऐवजी केवळ कागदी अहवाल सादर करून प्रशासन स्वतःची पाठराखण करत असल्याची टीका महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.