हिंदुस्थानी पर्यटकांची संख्या घटल्याने थायलंड सरकारचा मोठा निर्णय! आता 30 दिवस व्हिसा फ्री प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी पर्यटकांसाठी थायलंडने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी थायलंड सरकारने हिंदुस्थानी नागरिकांना 30 दिवसांचा व्हिसामुक्त प्रवेश देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. यापूर्वी मे महिन्यात थायलंड सरकारने 93 देशांसाठी असलेली व्हिसामुक्त प्रवेश योजना रद्द करून, ती केवळ 54 देशांपुरती मर्यादित करण्याचा प्राथमिक प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रस्तावामुळे हिंदुस्थानी प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि भारतातून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. चीन आणि मलेशियानंतर यंदा थायलंडला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये हिंदुस्थानचा तिसरा क्रमांक आहे. त्यामुळेच हिंदुस्थानातील पर्यटकांची संख्या कमी होणे थायलंडच्या पर्यटन व्यवसायासाठी मोठा धक्का ठरत होता.

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यटन मंत्री सुरासक फंचरोएनवोराकुल यांनी यासंदर्भात म्हटले की, हिंदुस्थान हा थायलंडसाठी अत्यंत महत्त्वाचा पर्यटन बाजार आहे. हिंदुस्थानी पर्यटकांच्या प्रवासाच्या सवयी आणि पर्यटन क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेऊन, सरकारने 30 दिवसांचा व्हिसामुक्त प्रवेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक बोलताना ते म्हणाले, “या निर्णयामुळे भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास सरकार त्याचा आढावा घेईल. मात्र सध्या हिंदुस्थानी पर्यटकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.” असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

 

दरम्यान, नव्या सरकारने व्हिसामुक्त धोरणाचा गैरवापर करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई करण्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे. काही विदेशी नागरिक बेकायदेशीर व्यवसाय, ऑनलाइन फसवणूक आणि इतर प्रतिबंधित कारवायांसाठी या सवलतीचा वापर करत असल्याची सरकारची चिंता आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवत पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानातून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच आता येत्या काळात हिंदुस्थानी पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशाला तुमची गरज आहे त्यामुळे आता आपण हे उपोषण मागे घ्यावे असे भावनिक आवाहन हे करण्यात आले आहे. त्यामुळे आता शबाना आझमी यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे समजते. शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत हे आवाहन केल्याचे आता दिसत आहे. सध्याच्या घडीला सोनम वांगचुक यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यामुळेच त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद अजूनही दिलेला नाही. त्यामुळेच आता या आवाहनाला प्रतिसाद कसा मिळतोय हे पाहायला मिळणे हे आता पाहणे आता गरजेचे झाले आहे. त्यामुळेच या संदर्भातील सर्व गोष्टींना आपण निर्णय घेऊ शकतो. त्यामुळेच आता या सर्व गोष्टींकडे पाहणे ही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळेच आता या गोष्टींना पाहणेही आता गरजेचे आहे. त्यामुळेच आता या गोष्टींना देशाची लढाई यापुढेही सुरु राहणार असल्याचे समजते.