
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण नानाविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो. परंतु अनेकदा ही महागडी सौंदर्य प्रसाधने आपल्या चेहऱ्याला हानी पोहोचवतात. त्यामुळे काही उपचार घरच्या घरी करणे हा पर्याय सर्वात उत्तम. म्हणूनच घरगुती उपायांनी चेहऱ्याला अनोखी चमक द्यायची असल्यास, मध आणि हळद हा सर्वात उत्तम उपाय मानला जातो.
त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण महागड्या उपचारांपेक्षा घरगुती उपायांना पसंती देतात. मध, हळद आणि कच्चे दूध वापरून तयार केलेला फेसपॅक त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करू शकतो.
एका वाटीत एक चमचा मध घ्या. त्यात अर्धा चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार कच्चे दूध घालून मिश्रण तयार करा. तेलकट त्वचा असल्यास त्यात मुलतानी माती आणि गुलाबपाणीही मिसळू शकता.
मध त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि क्लिन्झरचे काम करतो.
हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
कच्च्या दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील मृत पेशी दूर करून त्वचा उजळण्यास सहाय्य करते.
फेसपॅक थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कानामागे थोडासा लावून 10 मिनिटे थांबा. कोणतीही खाज, लालसरपणा किंवा अॅलर्जी जाणवली नाही तरच चेहऱ्यावर वापरा.
फेसपॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे ठेवून नंतर थंड पाण्याने धुवा. त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणे विसरू नका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास त्वचा स्वच्छ, मऊ आणि उजळ दिसण्यास मदत होऊ शकते.
कोणताही फेसपॅक चेहऱ्यावर लावताना आधी पॅज टेस्ट करून बघणे हे गरजेचे आहे. ही पॅच टेस्ट केल्यानंतरच घरगुती उपाय करणे हितावह ठरते.





























































