ज्यांची श्रद्धा खोटी त्यांचे पैसे चोरीला गेले! राम मंदिर लुटीवर भाजपचे निर्लज्ज तर्कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरातील लुटीमुळे दुखावलेल्या तमाम रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य भाजपचे आमदार व उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीन महाना यांनी केले आहे. ‘ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेने दान केले नव्हते, त्यांचे पैसे दानपेटीतून चोरीला गेले,’ असे निर्लज्ज तर्कट महाना यांनी मांडले आहे.

राम मंदिराच्या दानपेटीतील कोटय़वधींच्या लुटीप्रकरणी गुन्हे दाखल झाले. न्यासाच्या ट्रस्टींना राजीनामे द्यावे लागले. एसआयटीकडून सर्वोच्च न्यायालयाने अहवाल मागवला. असे असताना महाना यांनी राम मंदिर ट्रस्टवर विश्वास व्यक्त केला. ‘राम मंदिर ट्रस्टने देणग्यांचा पैसा विकासकामात लावला आहे. मंदिराचे भव्य स्वरूप हा त्याचा पुरावा आहे. त्यामुळे देणग्यांच्या वापराबाबत संशय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. ‘जे कधी जय श्रीराम बोलले नाहीत किंवा ज्यांनी राम मंदिरासाठी काही दिले नाही, त्यांनाच चोरीची जास्त चिंता आहे. आतापर्यंत देशातील कुठल्या संस्थेत कधी चोऱ्या झाल्याच नाहीत का?,’ असा अजब सवाल त्यांनी केला. ट्रस्ट बरखास्तीची मागणीही चुकीची असल्याचे महाना म्हणाले.

रामभक्तांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले ः काँग्रेस

महाना यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला. ‘देणगी चोरीसाठी रामभक्तांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देणगी चोरी झाली असेल तर त्याची चौकशी करायला हवी, इथे दान देणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. अशा विषयावर बोलताना किमान संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवत्ते सुरेंद्र राजपूत यांनी सुनावले.

राम मंदिरात चोरी करून या लोकांनी प्रभू श्रीरामाला रस्त्यावर आणलंय. त्यांनी श्रीरामाची वस्त्रं चोरली, अलंकार चोरले. सीतामाईचं मंगळसूत्र, कर्णफुलं आणि नथ चोरली. काय ठेवलंय यांनी? हिंदुत्व रस्त्यावरच आणलंय ना!

– संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार