
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे एका ६५ वर्षीय मंजुला नावाच्या महिलेला न्यायाधीशांच्या खुर्चीवर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी या महिलेने ही काळी जादू केली, असा तिच्यावर आरोप आहे.
फर्स्ट ॲडिशनल सीनियर सिव्हिल न्यायाधीश आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्या न्यायालयात ही घटना घडली. महिलेने कोर्टरूममध्ये प्रवेश करून न्यायाधीशांच्या टेबलावर ‘पूजा’ केलेले पांढरे मोहरीचे दाणे विखुरले. कोर्ट कर्मचाऱ्यांची नजर या मोहरीच्या दाण्यांवर पडली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यामध्ये ती महिला ही कृती करताना दिसली. पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.































































