विठुरायाच्या चरणी अर्धा किलो सोन्याच्या पादुका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या संपूर्ण राज्यात आषाढी एकादशीची तयारी सुरू असतानाच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एका भक्ताने अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका विठुरायाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. हा भक्त अहिल्यानगरमधील असून नाव उघड न करण्याच्या अटीवर या भक्ताने ही मौल्यवान भेट दिली आहे. या पादुकांची किंमत 56 लाख रुपये इतकी आहे.