
दक्षिण मध्य मुंबईत प्राईम लोकेशनवर हक्काचे घर खरेदी करण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडतर्फे शिवडी येथील 72 घरांची विक्री करण्यात येणार असून लवकरच त्यासाठी स्वारस्य निविदा (ईओआय) काढण्यात येणार आहेत.
शिवडी येथील किडवाई मार्ग स्टेशन येथे शिवशाही प्रकल्पाची सात मजली इमारत असून यात 434 चौरस फुटांची प्रशस्त घरे आहेत. 2012 साली या इमारतीमधील 144 घरे शिवशाहीने गृह विभागाला दिली असून उर्वरित 72 घरे धूळखात पडली आहेत. त्यामुळे या घरांची विक्री करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. या घरांची एकगठ्ठा विक्री करण्यासाठी लवकरच स्वारस्य निविदा काढण्यात येणार आहेत. रेडिरेकनरनुसार या घरांची बेस प्राईज 1 कोटी 16 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. त्याहून अधिकची बोली लावणाऱयाला घरे मिळणार आहेत.




























































