
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शौचालयाचे भांडे टाकलेले आढळले आहे. रत्नागिरी नगरपरिषद राबवत असलेल्या स्वच्छता अभियानाचा हा पर्दाफाश आहे. शौचालयाचे फुटलेले भांडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर टाकून देण्यात आले आहे.
रत्नागिरी नगर परिषद शहरातील स्वच्छतेवर भर देत असल्याचे सांगत आहे. शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता पहायला मिळत आहे. या अस्वच्छतेचा फटका जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला असून त्यांच्या आवाराबाहेर हे फुटलेले शौचालयाचे भांडे टाकण्यात आले आहे.





























































